
© Copyright 2009. "Ratnagiri Nagar Parishad, Ratnagiri " All rights reserved.
![]() |
| Êããñ‡ãнã㶾㠺ããß ØãâØãã£ãÀ ãä›ß‡ãŠ |
![]() |
| ãäÌã¶ãã¾ã‡ãŠ ªã½ããñªÀ ÔããÌãÀ‡ãŠÀ |
![]() |
| œ¨ã¹ã¦ããè ãäÍãÌãã•ããè ½ãÖãÀã•ã |
![]() |
| ÀãÓ›Èãä¹ã¦ãã ½ãÖ㦽ãã Øããâ£ããè |
![]() |
| ¹ãâ. •ãÌãÖÀÊããÊã ¶ãñÖÁ |
![]() |
| ¡ãù. ºããºããÔããÖñºã ‚ããâºãñ¡‡ãŠÀ |
![]() |
| ½ãÖ㦽ãã •¾ããñãä¦ãºãã ¹ãìŠÊãñ |
![]() |
| ÔããäÌã¨ããè½ãã¦ãã ¹ãìŠÊãñ |
![]() |
| Àã•ãÓããêè ÍããÖî ½ãÖãÀã•ã |
![]() |
| Àãӛȹã¦ããè Ôããõ. ¹ãÆãä¦ã¼ãã¦ããƒÃ ¹ãã›ãèÊã |
रत्नागिरी शहर हे लोकमान्यांची जन्मभूमि म्हणून ओळखली जाते. लोकमान्य टिळकांचा जन्म जुलै 1856ला टिळक आळीमध्ये झाला. त्यावेळी या आळीला मधली आळी म्हणून ओळखली जात असे. सन 1956 पासून भारत सरकारने लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रस्तुत वास्तू व मालमत्ता महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे. हे स्थळ आजही पर्यटकांना आकर्षित करत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे क्षेत्रफळ 10.49 चौ.कि.मीटर इतके आहे.रत्नागिरी मध्ये वार्षिक पाऊस सरासरी 3000 मि.मी.इतका पडतो. रत्नागिरी शहर पूर्वेकडे साळवी स्टॉप पर्यन्त, पश्चिमेकडे पेठकिल्ला तसेच दक्षिणेकडे कर्ला राजीवडा व आंबेशेत या हद्दीपर्यन्त असून उत्तरेकडे, परटवणे, डाफळेवाडी वरचा फगरवठार या मर्यादेत वसलेले आहे. रत्नागिरी नगर परिषदेची स्थापना झाली त्यावेळी लोकनियुक्त सभासद एकही नव्हता. त्यावेळी जिल्हयाचे जिल्हाधिकारी हे नगर परिषदेचे अध्यक्ष होते. तसेच 4 पदसिध्द अधिकारी व 12 सरकार नियुक्त सभासद होते. त्यावेळी रत्नागिरीची लोकसंख्या सुमारे 11000 इतकी होती. केंद्र शासनाने सन 1951 पासून भारताची खानेसुमारी; जनगणनासुध्दा सुरू केली. त्यावेळेपासून रत्नागिरी नगर परिषदेची लोकसंख्या खालील प्रमाणे ... |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
अरबी समुद्राच्या परंतु स्थानिकरित्या काळा समुद्र व पांढरा समुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या रत्नागिरी शहरास औद्योगिक महत्व सुध्दा आहे. या शहराचे हवामान उष्ण व दमट स्वरूपाचे असून एकंदरीत विचार करता आरोग्यदायी व प्रसन्न असे आहे. मान्सूुन मध्ये मोठया प्रमाणावर पाऊस पडतो. परंतु लागवडी योग्य सुपीक जमीन नसल्याने शेत पिकांचा अभाव आहे. परंतु रत्नागिरी येथील हापूस आंबा हा जगप्रसिध्द आहे. रत्नागिरीच्या प्रमुख उत्पन्नामध्ये आंबा अग्रगण्य आहे. तसेच मासेमारी उद्योगाशी हे शहर संबंधीत आहे. येथे मोठया प्रमाणावर कोळंबी, फ्रॉन्स यांची पैदास होते. त्यामुळे देशाला डॉलरचे स्वरूपात प्रचंड परकीय चलन मिळते. कोळंबीला स्थानिक भाषेत चिंगळे असेही म्हणतात. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
रत्नागिरी नगर पालिका सन 1876 मध्ये अस्तित्वात आली. रत्नागिरी नगर परिषदेचे काम महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 प्रमाणे चालते. यापूर्वी नगर परिषदेचे काम मुंबई नगर पालिका बरोज ऍक्ट 1925 प्रमाणे चालत असे. सन 1731 मध्ये कोल्हापूर आणि सातारा यांचे विभाजन झाल्यानंतर सातारा प्रांताचे प्रमुख झालेल्या राजर्षीद्न शाहू महाराजांकडे रत्नागिरी सोपविणेत आली. सन 1783 मध्ये रत्नागिरी पेशव्यांचे मुख्यालयही होते. हा आहे रत्नागिरी नगर पालिकेचा थोडक्यात इतिहास. |

![]() |